चोपडा, प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त संताजी जगनाडे महाराज मंदिरावर श्रीराम नगर चोपडा येथे तेली समाज चोपडा येथे तर्फे ह. भ .प .गोपीचंद महाराज सुंदरगडी चोपडाकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तनात त्यांनी नुसत्या संतांच्या संगतीत राहिल्याने सुद्धा जीवन अतिशय सुखदायी व आनंदी होते असे सांगितले .संतांच्या संगतीत राहिल्याने जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकते याची अनेक दाखले त्यांनी दिले. मग जीवनात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा असा मोलाचा सल्ला दिला .यावेळी सुरुवातीला संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून तसेच विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले .संस्थेचे अध्यक्ष श्री के. डी .चौधरी यांनी ह-भ-प गोपीचंद महाराज यांचे स्वागत केले .गोपीचंद महाराज यांचे हे पहिलेच कीर्तन होते. परंतु त्यांनी अत्यंत सुरेल , स्पष्ट आणि पहाडी आवाजात भाविकांना मंत्रमुग्ध केले .या किर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने एक प्रकारची समाजमान्यता मिळाल्याचे प्रतीत यावेळी दिसून आले. परिसरातील चोपडा हातेड लासुर व अन्य ठिकाणचे भजनी मंडळ यानी अतिशय उत्तम साथ दिली. ह .भ .प. बापू महाराज लासूरकर, प्रकाश महाराज लासूरकर, ह .भ .प .अभिजीत टेलर, ह भ प शिंपी महाराज आधी मान्यवर उपस्थित होते, प्रभावी कीर्तनाने प्रभावित होऊन भाविकांनी कीर्तनकार महाराज यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांचे पिता रघुनाथ चौधरी व माता चंदाबाई चौधरी यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. तसेच चोपडा तालुका तेली समाज महासंघ अध्यक्ष श्री प्रशांत चौधरी यांचा सुपुत्र ची.निशांत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या देण्यात आल्या. कार्यक्रमाला नंदू चौधरी ,संजय चौधरी, नारायण चौधरी ,महेंद्र चौधरी ,आबा चौधरी, प्रदीप चौधरी, शशिकांत चौधरी, देवकांत चौधरी ,किरण चौधरी, शिवाजी चौधरी,जितेंद्र चौधरी आदींनी परिश्रम घेऊन व्यवस्था केली. श्री प्रशांत चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले .तर के. डी .चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.