पाचोरा प्रतिनिधी – भगवान शिवशंकराने अमृत मंथनानंतर निघालेले विष प्राशन करून संपूर्ण विश्वाला वाचविले आणि ते ‘निळकंठ’ ठरले. मनुष्यांच्या सेवेसाठी कोरोनासारख्या विषाणूंचा लढा देत सामाजिक बांधिलकी जोपासणारे पाचोरा येथील वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील हे सुद्धा आताचे ‘निळकंठ‘ म्हटले तर वागवे होणार नाही. भडगाव तालुक्यातील वाक येथील डॉ. निळकंठ नरहर पाटील (M.B.B.S.D.Ortho) अस्थिरोग तज्ज्ञ असून त्यांच्या सोबत डॉ.विजय नरहर पाटील,(M.B.B.S.D.G.O) स्त्री रोग तज्ज्ञ सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवा देत असतानाच सामाजिक कार्यात ही त्यांचा हातभार मोठा आहे. वाक गावात डॉ. निळकंठ पाटील हे सरपंच असून यातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत. महाराष्ट्र ग्रामसभा संघटनेत ही तालुका अध्यक्ष म्हणून डॉ.निळकंठ पाटील यांनी यशस्वी धूरा सांभाळत अनेक सामाजोपयी कार्य केलेली आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ.निळकंठ पाटील यांचा आज वाढदिवस. अत्यंत सुस्वभावी हसरे व्यक्तिमत्त्व सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने बोलण्याने ते प्रत्येकाच्या जीवाभावाचे होऊन जातात. मानसिक खच्चीकरण झालेल्यांचे मनोबल वाढवून, येणाऱ्या रूग्णांशी, नातेवाईकांशी स्नेहपूर्ण व्यवहारातून वैद्यकीय शिक्षण हे सेवेचे माध्यम ठरू शकते हे दाखवून देतात. मुंबई, पुणे सह एखाद्या मेट्रो सिटीमध्ये जे उपचारपद्धती असते ती पद्धत, यंत्रसामुग्री त्यांनी वृदांवन हॉस्पीटलच्या माध्यमातून पाचोरा येथे उपलब्ध करून दिली आहे.
सर्वच उपचार एकाच छताखाली असून सुसज्ज हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टिम उपलब्ध आहे. डॉ.प्रफुल्ल काबरा, डॉ.पी.पी.गायकवाड, डॉ.अंकुर झंवर, डॉ.अमृता झंवर, डॉ.आरती काबरा, डॉ.प्रशांत शेळके, डॉ.अंजली शेळके, डॉ.अर्चना पाटील, डॉ.विजय पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. पाचोरा शहरातील व तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना जळगाव, पुणे औरंगाबाद कुठेही जाण्याची यामुळे गरज पडत नाही. वृंदावन मल्टिस्पेशालिटी सुसज्ज असे भव्य हाॅस्पीटलमध्ये सध्या गोरगरीब रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मार्फतही सध्या उपचार सुरू आहेत. या योजनेचा गेल्या काही दिवसांपुर्वी पाचोरा–भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांचाहस्ते शुभारंभ करण्यात आला.