जळगाव – विठु माऊली तु माऊली जगाची.., माऊली तर मूर्ती विठ्ठलाची… विठ्ठला… मायबापा….असा विठुमाऊलीचा गजराने गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थामध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्यासह जळगाव खुर्दचे सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. बा विठ्ठला तुझ्या लेकरांवर सदैव कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, जळगाव खुर्दचे सरपंच विलास बळीराम पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाचा गजर करत पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, वासुदेव पाटील, मिलींद सरोदे, ललित रमेश बोंडे, पंकज मधुकर राणे, हेमंत धनराज बर्हाटे, किशोर सुधाकर काळे, तुषार फेगडे, सागर पाटील, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे राहुल गिरी, किशोर नंदवे, किशोर काळे आदिंची उपस्थीती होती. कोरोना नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. गोदावरी फाऊंडेशनसह जळगाव, भुसावळ, सावदा येथील शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठलांवरील अभंग, गीतांचे सादरीकरण
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा, जळगाव आणि भुसावळ येथे ऑनलाईनद्वारे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषा करीत विठ्ठलांवर आधारित गीतांचे सादरीकरण केले. यात विठु माऊली तू…., विठ्ठल विठ्ठल…, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी…, पाऊले चालती पंढरीची वाट…., नको गं रुक्मिणी हट्ट धरु मंगळसुत्रासाठी.., देवा तुझ्या नामाचा गं येडं लागलं.., जय जय राम कृष्ण हरी… यासारखी अभंग, गीते सादर करत नृत्याचाही ताल धरला. याशिवाय डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धा, अभंग, भजन, गायन स्पर्धांचे आयोजन केले होते, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तत्पूर्वी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिसींपल भारती महाजन, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिंसीपल निलीमा चौधरी, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिसींपल अनघा पाटील यांच्यासह शिक्षकांनी दिपप्रज्वलन करत विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले, त्यानंतर ऑनलाईनद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनीही विठु-रुखमाईची वेशभुषा साकारत अभंग, गीते सादर करत सहभाग नोंदविला.