Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाचे यश

by Divya Jalgaon Team
July 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव – मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृध्दाची म्युकरमायकोसिसची येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी २० जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिगंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी भेट घेवून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

अमळनेर तालुक्यातील तऱ्हाडी ता. अमळनेर येथील एका ६५ वर्षिय पुरुषाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. या रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले. या ठिकाणी रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरु करण्यात आले. या रुग्णास महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. मधुमेह असणाऱ्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बधिरिकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. सचिन पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वार्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, जोस्त्ना निंबाळकर, नजमा शेख, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, किशोर चांगरे, विवेक मराठे आदींनी सहकार्य केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शस्त्रक्रिया गृहात भेट देऊन सदर वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. प्रसंगी म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे उपस्थित होते. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

Share post
Tags: #civil hospital Dr. chawhan#Dr.jaypraksh Ramanand#Micromiciscorona related newsDivya Jalgaon NewsJalgaon news
Previous Post

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा

Next Post

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमीत आषाढी एकादशी साजरी

Next Post
वर्धमान युनिव्हर्स अकॅडमीत आषाढी एकादशी साजरी

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमीत आषाढी एकादशी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group