जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका जाहिरात एजन्सीवर अज्ञातांकडून रॅनसमवेअर व्हायरसद्वारा सायबर हल्ला झाला आहे.
जाहिरात क्षेत्रात ग्राहकसेवेत असलेल्या जळगावातील नामांकित ”प्रचिती मीडिया या जाहिरात संस्थेवर शनिवार दिनांक १७/७/२०२१ रोजी अज्ञातांकडून रॅनसमवेअर व्हायरसद्वारा सायबर अटॅक झाला. या हल्ल्यात प्रचिती मीडियातील १३ कॉम्प्युटरमधील डेटा दिलीत झाला असून हल्लेखोरांद्वारा रविवार दिनांक १८/७/२०२१ रोजी प्रचिती मीडियाला प्राप्त एका संदेशाद्वारे डेटा पुन्हा मिळवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक कम्पुटरमागे ९८० डॉलर्स सुमारे ८०००० रुपये म्हणजेच एकंदरीत १३ कंप्युटर्ससाठी दहा लाख चाळीस हजार इतक्या रकमेची मागणी करण्यात आली आहे.
प्रचिती मीडियातील प्रिंटींग मशीन , ऑफसेट प्रिंटिंग मशीन , येथे उपलब्ध असलेली भारतातील एकमेव वॉल पेंटिंग मशीन , ८ नवे कम्प्युटर्स , २ नवीन लॅपटॉप या सगळ्यातला डेटा डिलीट-बाधित झाला आहे. साधारणपणे असे हल्ले नामांकित संस्था -कंपनी यांवर केले जातात. एमआयडीसीत गोदावरी इंजि . महाविद्यालयाशेजारी सोयो कंपनीच्या परिसरात असलेली प्रचिती मीडिया ही अल्पावधीत नावारूपाला आलेली व गुणवतापूर्ण उत्कृष्ट सेवेमुळे ग्राहकप्रिय झालेली नामांकित संस्था आहे . येथे ४ ग्राफिक डिझायनर , ६-डिजिटल मार्केटिंग पर्सन , ४-आउटडोअर पब्लिसिटी , ३- मार्केटिंग एक्सझिक्युटीव्ह , २- टेली कॉलर, २– कन्टेन्ट रायटर इतके मनुष्यबळ कार्यरत असून १ प्रिंटिंग मशीन , १ वॉलपेंटिंग मशीन , १ डिजिटल कटिंग मशीन ,१ फ्लेक्स प्रोलिन्टिंग मशीन आणि एकूण १६ कंप्युटर्स असून हि सगळी सामग्री बाधित झाली आहे . रॅनसमवेअर व्हायरस हा ४—५ दिवसांपूर्वी आलेला असून त्याने जगभरातील सुमारे १५०० कंपन्यांना आपले लक्ष्य केले आहे. या रॅनसमवेअर व्हायरसद्वारा संगणकावर करत असलेल्या कोणत्याही कामाच्या फाईल्स लॉक होतात. या सायबर हल्ल्यातून सावरण्यासाठी प्रचिती मीडियाची संपूर्ण टीम अथक प्रयत्नशील आहे . सदैव प्रचिती सोबत असणाऱ्या प्रचिती मीडियाच्या तमाम सन्माननीय ग्राहकांनी सेवेबाबत विलंब व खंड निर्माण झाल्यास या प्रतिकूल परिस्थितीत कृपया समजून घेत सहकार्य वृद्धिंगत करावे अशी विनंती तसेच आपणही अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे यांनी केले आहे.