पाचोरा, प्रतिनिधी । येथील आज शिंपी समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अभियंता सूर्यकांत निकम तर महिला मंडळ अध्यक्ष पदी मंजुषा मांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
पाचोरा शहर शिंपी समाज सेवा मंडळच्या अध्यक्ष पदी अभियंता सुर्यकांत देविदास निकम यांची सलग तिसऱ्यांदा निवड तर महिला मंडळ अध्यक्षापदी मंजुषाताई राजेंद्र मांडगे यांची सलग दुसऱ्यांदा निवड. दिनांक १८ रोजी पाचोरा शहर शिंपी समाज सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुर्यकांत निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत दि.६ ऑगस्ट रोजी येणाऱ्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी कोविड -१९ या जागतिक महामारीच्या संभाव्य धोके लक्षात घेता साध्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरविले. विद्यमान अध्यक्ष व अध्यक्षा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नविन कार्यकारिणी गठीत करणेबाबत सभेत मांडण्यात आले. सभेत निष्पक्षपणे कार्यकारिणी ची निवड व्हावी म्हणून जेष्ठ समाज बांधव मुरलीधर सोनवणे यांची पिठासन अधिकारी व त्यांच्या सोबत नेमिचंद खैरनार व राजु कापुरे यांच्या समितीची निवड करण्यात आली.सभेचे सर्व सुत्र त्यांचेकडे सोपविण्यात आले. निवड समितीने अध्यक्ष निवडीबाबत सभेत सुचना मांडली व अध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी सभेत आपली उमेदवारी घोषित करण्यास सांगितले. अध्यक्ष व अध्यक्षा पदासाठी कोणीही उमेदवारी न घोषित करता विद्यमान अध्यक्ष व अध्यक्षा यांनीच उमेदवारी करावी असे शैलेश शिंपी यांनी सुचविले व त्यास राजेंद्र शिंपी यांनी अनुमोदन दिले. सभेत मांडलेल्या या विषयावर सविस्तर चर्चा झाली.चर्चेत भिकाशेठ शिंपी, विजयशेठ खैरनार, राजेंद्र मांडगे, कैलास निकम, राजेंद्र कापुरे , मुकेश जगताप, विनोद जगताप, भुषण शिंपी, जितेंद्र वामन, दिपक कापुरे, धनंजय सोनवणे, डॉ.मनोहर बाविस्कर, नयना सुर्यकांत, माधुरीताई कापुरे, मनिषाताई कापुरे, चैताली जितेंद्र, दिपालीताई संजय इ.नी सहभाग घेतला. सभेत सर्वानुमते अध्यक्ष पदी अभियंता सुर्यकांत निकम व महिला मंडळ अध्यक्षापदी मंजुषाताई मांडगे यांची फेर निवड करण्यात आली. व पिठासन अधिकारी व समिती सदस्यांनी तसे घोषित केले.
सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्त वाचुन कायम करण्यात आले.सभेच्या सरूवातीस सचिव कैलास निकम यांनी सर्व समाज बांधवांचे स्वागत करुन सभेला सुरूवात केली. सभेत समाजातील दिवंगत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्ष सुर्यकांत निकम यांनी संस्थेच्या कार्यअहवालाचे वाचन केले व झालेल्या खर्चास सभेची मान्यता घेतली. सभेत विविध पदांवर निवड झालेल्या, पदोन्नती मिळालेल्या, व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त झालेल्या व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच कोविड योध्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. म.अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करून संमत करण्यात आले त्यात संस्थेचे सभासदत्व पुढील एक वर्षासाठी कायम ठेवण्यात आले. तसेच पाचोरा शहर शिंपी समाजाचे जेष्ठ समाजसेवक , विश्वस्त, जिल्हा कार्यकारिणी चे सल्लागार व मार्गदर्शक भिकाशेठ शिंपी यांना पाचोरा शहर शिंपी समाजाचे वतीने कर्तव्यदक्ष शिंपी सम्राट म्हणून पुरस्कृत करण्यात आले व येत्या काळात होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात यावे असा ठराव संमत करण्यात आला.