जळगांव, प्रतिनिधी । मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन तर्फे विविध ठिकाणी १५० वृक्ष रोपण करण्यात आले.
कोरोना काळात प्राणवायूची कमतरता व पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल अवेळी पाऊस पडणे, जास्त कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी ओझोन वायूचा स्थरावर पडलेला फरक यामुळे जास्त प्रमाणात उष्णता मानवी जीवन व पक्षी, प्राणी जीवनावर घातक ठरत आहे याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असे मनोगत राखीव पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी वृक्ष रोपण करते वेळी केले. जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ, जांभूळ, चिंच, वळ, निम या जातीचे १५० वृक्ष लागवड करण्यात आले. विविध ठिकाणी ५०० वृक्ष मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने लागवड करण्याचा संकल्प केला आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी यावेळी सांगितले.
पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे व भारतीय छप्परबंद समाज सुधारक मंडळचे संस्थापक उपाध्यक्ष अजमल शाह यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले. विभागीय वन अधिकारी एस.वाय.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून अमन रोटरी फाऊंडेशनचे डॉ. शरीफ शेख, भगीरथ शाळेचे शिक्षक नागेश सोनार, सहा.पोलिस निरीक्षक भरत चौधरी ,फाऊंडेशन सदस्य मोनाली कुमावत, गणेश जोशी, पोलीस प्रशिक्षक सोपान मास्टर,धीरबक्षी मास्टर,दिपक मास्टर,किरण मोरे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते.
या उपक्रमाला श्री. स्वामी समर्थ विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, कुंभार समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, कृती फाऊंडेशनचे सदस्य अमित माळी, श्री.गायत्री पल्सेसचे संचालक निखिल ठक्कर यांचे सहकार्य लाभले.