भुसावळ : शहरातील आठवडे बाजार भागातील दर्शन टेलर्स या दुकानाला शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दुकानातील इस्त्री सुरू राहिल्याच्या कारणाने आग लागली. पाहता-पाहता दुकानातील कपड्यांनी पेट घेतल्याने आग पसरण्याची भीती होती.
मात्र साईसेवक तथा नगरसेवक पिंटू कोठारी व व्यापार्यांनी वेळीच धाव घेवून आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग वेळीच नियंत्रणात आली नसतीतरी शेजारच्या दुकानांमध्येही आग पसरण्याची शक्यता होती.
अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण
आठवडे बाजारात दर्शन टेलर्स हे दुकान आहे. रात्री दुकान मालकाने इस्त्री बंद न करताच दुकान बंद करून घर गाठले मात्र अधिक वेळ इस्त्री सुरू राहिल्याने काऊंटर पेटले तसेच काऊंटरमध्ये असलेले सुमारे 50 ड्रेस जळून खाक झाले. यावेळी एका मुलाने नगरसेवक पिंटू कोठारी यांना आगीची माहिती कळवताच त्यांनी घटनास्थळी आपल्या मित्र मंडळींसह धाव घेतली तसेच शेजारील व्यापारी आग विझवण्यासाठी धडपड केली.
सुरुवातीला दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यश न आल्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकवल्यानंतर माती, रेती व पाणी टाकून अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले तर काही वेळानंतर अग्निशमन दलाचा बंबही दाखल झाला मात्र तो पर्यंत आगीवर नियंत्रण मिळाले होते. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाले नसलेतर त्याचा फटका आजू-बाजूच्या दुकानांनाही बसण्याची भीती होती.