जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे रोटरी फाऊंडेशनला एकाच वेळेस सुमारे दोन कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या माजी प्रांतपाल राजीव शर्मा (भुसावळ) यांचा पहिला जाहिर सत्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, माजी सहप्रांतपाल गनी मेमन, रश्मी शर्मा, कु.महिमा शर्मा आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी रोटरी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांसाठी अनेकदा लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. यावर्षी त्यांनी एकाच वेळेस 1 कोटी 82 लाख 50 हजार इतकी रक्कम देणगी म्हणून देऊन रोटरी फाऊंडेशनच्या आर्च क्लम्प सोसायटीचे सदस्य होण्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केला आहे. त्याच बरोबर फाऊंडेशनच्या मुख्य कार्यालयात नामफलकावर त्यांच्या नावाची नोंद घेतली जाणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 या नासिक ते नागपूर कार्यक्षेत्रातील 110 क्लब मधील हजारो सदस्यांमधुन हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले रोटरी सदस्य आहे. त्यानिमित्त रोटरी वेस्टने त्यांच्या दातृत्वाचा प्रेरणादायी सत्कार आयोजित केल्याची भावना अध्यक्ष कृष्णकुमार वाणी यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राजीव शर्मा यांच्या दानशुर वृत्तीचे अभिनंदन करुन रोटरी वेस्ट सारख्या संस्था कोविड काळात ऑक्सिजन पाईपलाईन निर्मितीसाठी पुढे आल्यामुळे प्रशासनाला व्हेंटीलेटर सारख्या आवश्यक वैद्यकिय सुविधा निर्माण करता आल्या. त्यामुळे अधिक लोकांचे प्राण वाचविता आले, असे प्रतिपादन केले.
राजीव शर्मा यांनी सत्काराला उत्तर देतांना प्रांतपाल झाल्यानंतर व आता देणगी दिल्यानंतर दोन्ही वेळेस पहिल्यांदा रोटरी वेस्टनेच माझा सन्मान केला. रोटरी वेस्टबद्दल कायम मनात आपुलकीची भावना आहे असे सांगून फाऊंडेशनला देणगी दिल्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या रक्कमेत आपल्याला आपल्या लोकांसाठी कायम स्वरुपी खुप मोठे सेवा प्रकल्प उभे करता येतात असे सांगितले.
ॲड. सुरज जहांगिर यांनी रोटरी वेस्टच्या कार्याची माहिती दिली. संदीप काबरा यांनी राजीव शर्मा यांचा कार्यपरिचय सादर केला. प्रेसिडेंट एन्क्ल्यु लक्ष्मीकांत मणियार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंतनु अग्रवाल व सरिता खाचणे यांनी तर आभार डॉ. अर्चना काबरा यांनी मानले.
कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट जॉईंट सेक्रेटरी अनंत भोळे, सहप्रांतपाल गोविंद मंत्री, संगीता पाटील, वेस्टचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण बगडिया, रमण जाजू, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, किरण राणे, अनिल कांकरिया, डॉ. राजेश पाटील, योगेश भोळे, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष राजेश चौधरी, रोटरी जळगाव इलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर, रोटरी जळगाव स्टार्सचे अध्यक्ष निरज अग्रवाल, सचिव विपुल पटेल आदिंसह रोटरी वेस्टच्या सदस्यांची उपस्थिती होती.