जळगाव – शिवसेना नेते, विधिमंडळ गटनेता, राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथजी शिंदे यांचा शनिवार, दि. १० जुलै २०२१ रोजी जळगाव जिल्ह्याचा नियोजित दौऱ्यानुसार दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. समस्त जळगावकरांच्यावतीने विमानतळावरच महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्हा बँकेचे संचालक व रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख व माजी आमदार प्रा.श्री.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या घरी भेट दिली व त्यांचे वडील कै.बळीरामदादा तोताराम सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत चोपड्याच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार श्री.किशोरजी पाटील, पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार श्री.चिमणरावजी पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख (जळगाव) श्री.संजयजी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख (रावेर) श्री.विलासजी पारकर, महापौर श्री.कुलभूषण पाटील, जळगाव महानगरपालिका आयुक्त श्री.सतीशजी कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-जिल्हा व अमळनेर) श्री.विष्णूजी भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख (एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव) श्री.डॉ.हर्षलजी माने, माजी महापौर श्री.नितीनजी लढ्ढा, जळगाव शिवसेना महानगराध्यक्ष श्री.शरद तायडे, श्री.गजानन मालपुरे, नगरसेवक श्री.अनंतजी (बंटी) जोशी, श्री.नितीन बर्डे, श्री.प्रशांत नाईक, श्री.विराज कवडीया, शिवसेना पदाधिकारी, समस्त शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.