भडगांव प्रतिनिधी – राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथराव शिंदे यांचा दि.१० जुलै रोजी भडगाव-पाचोरा तालुका दौरा आहे. सदर दौऱ्या दरम्यान पाचोरा-भडगाव न.पा.अंतर्गत झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळा तसेच होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याअनुशंघाने सदर दौरा यशस्वी व्हावा यांचे नियोजनार्थ भडगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दि.७ जुलै रोजी शिवसेना कार्यालय भडगाव येथे संपन्न झाली.याप्रसंगी चाळीसगाव येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी तात्यासाहेब विकास पाटील यांची निवड झाल्याबद्दल तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती वर संचालक म्हणून आबासाहेब युवराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मा्. नगरअध्यक्ष राजेंद्र जिभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश अण्णा परदेशी, तालुका प्रमुख डॉ.विलास पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख जे.के.पाटील. मा.जि.प.सभापती विकास पाटील,मा्.नगरअध्यक्ष राजेंद्र जिभाऊ, प्रशांत पवार, शशिकांत येवले, मनोहर चौधरी, डॉ.प्रमोद पाटील, युवराज आबा, डॉ.विशाल पाटील, नगरसेवक जगनभोई, संतोष महाजन, संजय सोनवणे,शंकरभाऊ मारवाडी,लोण येथील आदर्श सरपंच विजय आबा,अशोक दादा,देवा अहिरे,व शहरप्रमुख, योगेश पाटील, महिला आघाडी शहरप्रमुख पुष्पाताई परदेशी, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटिल,तालुका युवाधिकारी रविंद्र पाटील,शहर युवाधिकारी निलेश पाटील..आदि शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.