मुंबई वृत्तसंस्था – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी रात्री ईडीने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता भोसरी भूखंड प्रकरणी त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे आता खडसे यांच्या भोवती ईडीची चौकशी लागण्याची शक्यता आहे.