मुंबई – मुंबई येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
महाराजांचे नाव ज्ञानेश्वर पाटील असे असून आज ते जळकेकर महाराज म्हणून सर्वत्र परिचित आहे. महाराज हे जळगाव जिल्हा शिवसेनेचे संघटक म्हणून काम करत होते. शिवसेना माजी जिल्हा संघटक म्हणून काम करीत असतांना, सुरेशदादांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये महाराजांना घेण्याचा शब्द देऊनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराजांना न्याय दिला नाही, महाराज शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पक्षांतर्गत बरेच अन्याय झाले असून आज राज्यामध्ये सेनेची सत्ता असूनही वारकरी संप्रदाय यांना योग्य ती वागणूक मिळत नसल्यामुळे जळकेकर महाराजांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक वारकरी संप्रदाय त्यांच्या सोबत येण्यात तयार असून येत्या पुढील काळात त्यांचा सुद्धा प्रवेश जळकेकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली होईल असे जळकेकर महाराज यांनी कर्वले आहे