जळगाव – कोरोना काळात २३ मार्च २०२० पासून सर्व प्रकारच्या शाळा बंद असूनही अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ही बंद आहे. शाळां मधे सर्व शिक्षण बंद आहे असे असतांनाही अनेक शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्याकडे फी मागण्याचा तगादा लावतात ही पालक व विद्यार्थांची पिळवणूक थांबवावी म्हणून आपणास हे निवेदन देत आहोत
आमच्या मागण्या:-
1. शालेय (१ली ते १२ वी) विद्यार्थ्यांची सरसकट फी माफ करावी.
2. संस्था चालकांनी विद्यार्थी फी भरत नाही म्हणून कागदपत्रे अडवणे, मार्कशीट अडवणे असा प्रकार सुरू केलाय तात्काळ संबंधीत शाळेना सूचना देणे.
3. काही शाळांनी कोरोनाच्या काळात सुद्धा फी वाढवली आहे ती फी वाढ रद्द करणे.
4. ट्युशन फी व्यतिरिक्त कोणतीच फी मागील दीड वर्षातील घेऊ नये.
5. शालेय विद्यार्थ्यांचे रखडलेले स्कॉलरशिप तात्काळ विद्यार्थ्यांना दयावे.
6. स्कॉलरशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते निशुल्क ओपन कण्याचे आदेश द्यावेत.
7. शाळा सुरू नसताना कोणत्याही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी जबरदस्ती करू नये.
8. 10 वी व 12 वीच्या मुलांची परीक्षा झाली नसल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ परत करावे.
9. विद्यार्थ्यांना इच्छेनुसार शाळा, कॉलेज बदलायचे असेल तर त्यांना स्वातंत्र्य दयावे. त्यांची अडवणूक करू नये.
वरील मागण्या मान्य न झाल्यास युवा लोक संघर्ष मोर्चा ह्या विरुध्द तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष भरत कर्डिले ,प्रतीक जोशी सुगद शेंगदाणे अजय पावरा सीमा तायडे यांची उपस्थिती होती.