मेष:- कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.
वृषभ:-उगाचच शब्दांचा अतिवापर करू नका. संयम टिकवून ठेवावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
मिथुन:-अघळ-पघळ बोलणे टाळावे. मुद्यांपासून दूर जाऊ नका. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. कामाचा ताण जाणवेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
कर्क:-नियम व अटींचे पालन करावे. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल. हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.
सिंह:-तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे.
कन्या:-रहाणीमान सुधारण्यास वाव आहे. भागीदारीत चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभणे खुश व्हाल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका.
तूळ:-हातातील कामांना गती येईल. कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल.
वृश्चिक:-नवीन प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल. मनातील शंका-कुशंका संपतील.
धनू:-प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा.
मकर:-नवीन जोमाने कामे करा. कामाची थोडीफार धांदल राहील. भावंडांशी मतभेद वाढवू नका. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल.
कुंभ:-कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात. काही अनपेक्षित जबाबदार्या येऊ शकतात.
मीन:-तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.