Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी

 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता 

by Divya Jalgaon Team
July 2, 2021
in प्रशासन
0
राज्यातील शासकीय हरित इमारतींचे होणार मानांकन

मुंबई –  जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टाईप 1 ते 4 चे एकूण 11 निवासस्थांनाच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी या निवासस्थानांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निवासस्थानांचे बांधकाम सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

अंबड येथे 8 शासकीय निवासस्थाने व एका विश्रामगृहाच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चार सूटचे शासकीय विश्रामगृह बांधण्यास तसेच टाईप 1 व 2 प्रकारची 8 शासकीय निवासस्थानांच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रस्तावांच्या एकूण 376.66 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विनंतीनुसार, सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये अंबड येथे चार सूटचे नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी 192.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टाईप 1 व 2 प्रकारच्या आठ निवासस्थानांच्या बांधकामासाठी 184.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकासही यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. अंबडमध्ये सुसज्ज व परिपूर्ण असे विश्रामगृह व शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

Share post
Tags: जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
Previous Post

मॅनेजमेंट क्षेत्रात मुबलक करिअरसंधी : प्रा.समिश दलाल

Next Post

गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

Next Post
गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group