जळगाव – व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय असून आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडून त्यात स्मार्टली काम करून “स्मार्ट उद्योजक” होता येते तसेच व्यवसायासाठी जसा पैसा महत्वाचा असतो तसेच उत्तम नियोजनही यासाठी महत्वाचे ठरते. व्यवस्थापन हा विषय विशिष्ट क्षेत्रांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बँकिंग, मार्केटिंग या विभागांसह हेल्थ मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या विविध क्षेत्रात अनेक संधी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना खुल्या आहेत. अंगभूत कौशल्यांना विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन शास्त्राच्या शिक्षणाची जोड द्यावी, असे आवाहन मुंबई येथील एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे प्रा.समिश दलाल यांनी व्यक्त केले.
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या “कॉर्पोरेट कनेक्ट” या उपक्रमात “चेलेंज अॅन्ड ऑपोच्युनिटीस इन फॅमिली मॅनेज्ड बिजनेस” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुंबई येथील ओसीस इंफ्रास्ट्रक्चर प्रा. ली.चे संचालक सिए ओम ठाकर, औरंगाबाद येथील मराठवाडा ऑटोकंपो प्रा. ली. चे संचालक मिहीर सोन्दगावकर व सुरत येथील जय मेटल टेकच्या मॅनेजिग पार्टनर वैभवी चोक्सी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, “कॉर्पोरेट कनेक्ट” या उपक्रमाचा विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व मार्गदर्शकाचे सकारात्मक अनुभव त्याचा प्रॅक्टीकल अभ्यास याने विध्यार्थ्यांना एक नवी वाटचाल मिळेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यशाळेत बोलताना श्री. दलाल पुढे म्हणाले की आजच्या तरुणाईने प्रत्येक आव्हानाला प्रोब्लेम म्हणून न बघता एक चॅलेज म्हणून त्या आव्हानाला सामोरे जायला हवे तसेच युवतींमध्ये प्रचंड शक्ती आहे. फक्त प्रत्येक स्त्रीने ती ओळण्याची गरज आहे तसेच एक स्त्री साक्षर झाली की सारं कुटुंब साक्षर होतं, असं म्हटलं जातं आणि ते यथार्थ आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विकासात 50 टक्क्यांपेक्षाही जास्त योगदान महिलांचेच आहे. गरज आहे ते योगदान अजून वाढवण्याची. स्त्रियांमध्ये जिद्द, चिकाटी, उत्साह, कष्ट करण्याची तयारी, कल्पकता, विनम्रता हे सुप्त गुण तर आहेतच; गरज आहे केवळ या गुणांना, तिच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याची. तिच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याची. महिला व्यवसायामध्ये आल्या तर त्या यशस्वी व्यवसाय करू शकतात असे मत वैभवी चोक्सी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सदर ऑनलाईन कार्यशाळेचे प्रा. तन्मय भाले हे समन्वयक होते तर आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले. तसेच या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया यांनी सहकार्य केले.