जळगाव – गावठी पिस्तूल घेवून पिंप्राळा परिसरातील भवानी माता मंदीर परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला गावठी कट्ट्यासह रामानंदनगर पोलीसानी आज शनिवारी सकाळी अटक केली आहे. महेश वासुदेव पाटील (वय-२१) रा. हिरा शिवा कॉलनी असे आरोपीचे नाव आहे.महेश हा गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस पथकाने पिंप्राळा येथील भवानी माता मंदीर परिसरात असलेल्या पान टपरीजवळ संशयित आरोपी महेश पाटील हा दिसून आला. त्यांची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचा गावठी पिस्तूल आढळून आला. पोलीस कॉन्स्टेबल सागरकुमार देवरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी, पोलीस नाईक विनोद सोनवणे, रवि पाटील, सागर देवरे, पोहेकॉ संजय सपकाळे यांनी कारवाई केली.