जळगाव – चांदसर बु ता.धरणगाव येथे 7/12 दुरुस्ती शिबीर नायब तहसीलदार सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 च्या मध्ये चुका झाल्या असतील त्यांच्यासाठी हे शिबीर ठेवण्यात आले होते.यावेळी प्रांत सो विनय गोसावी, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे,नायब तहसिलदार मोहोड यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. तसेच काही चुका झाल्या असतील असे शेतकऱ्याचे ही अर्ज यावेळी घेण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टनसिग ठेवण्यात आले. शिबीराला मंडळ अधिकारी बाविस्कर ,धरणगाव तालुका तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष एस.डी. गवई , व अन्य शेतकरी हजर होते.