जळगाव, प्रतिनिधी । इकरा शिक्षण संस्थेचे इकरा एच जे थीम महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमा ची सुरवात कुराण पाढण करून काजी मुजम्मिल नदवी यांनी केली.
महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.सय्यद शुजाअत आली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल गुरव व त्यांच्या पत्नी अंजना गुरव होत्या. प्रा डॉ. चांद खान यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेश भामरे यांनी केले. त्यानंतर सुनील गुरव यांनी योगाचे विविध आसन करून दाखवले. तसेच त्याचे फायदे काय हे समजून सांगितले. त्या नंतर प्राणायाम व हास्य योग करून मान किती प्रसन्न राहतो हे पटवून दिले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य पिंजारी, युसुफ पटेल, डॉ.इरफान, डॉ. अमीन, डॉ. दापके, डॉ. फिरदौसी, प्रा. साजित मलक, डॉ. मुस्तकीम, डॉ.अख्तर शाह, डॉ. तन्वीर खान, प्रा. उमर खान, डॉ. वकार शेख, तसेच महिलामध्ये, डॉ. कुलकर्णी, प्रा. देवकर, डॉ. फिरदौस शेख, डॉ. शबाना, प्रा. काहेकशा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजू गवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ऑनलाईनची सुद्धा सुविधा करण्यात आली होती.