जळगाव प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठेकेदाराला लूट प्रकरणी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ठेक्यावर कार्यरत ठेकेदार सुधीर व्यंकट रविपती(वय-४०,रा.नेरी जामनेर) ३ एप्रिल रोजी महामार्गाच्या कामाची पहाणी करण्यासाठी कुसूंबा पर्यंत आले होते. कामगारांना सुचना देऊन मध्यरात्री (२३.३०) नेरीकडे स्वतःच्या गाडीने निघाले. चिंचोली ते उमाळा दरम्यान ट्रिपलसीट दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी रस्ता अडवून रविपती यांचे वाहन थांबवले. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सेान्याची चैन, दोन अंगठ्या आणि रोकड असा १ लाख २५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरुन, सोबतच-गुगल पे, फोन पे फोनचा पासर्वर्ड विचारून पुन्हा मारहाण करत पेाबारा केला हेाता. रविपती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ४ एप्रील रेाजी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यावर निवृत्ती ऊर्फ भगवान शांताराम बाविस्कर (वय-३२,), राहुल रामदास कोळी (वय-२२. दोन्ही रा..मेस्को माता नगर) यांना एक महिन्यानंतर ५ ऐप्रील रेाजी अटक करण्यात आली होती. या दोघांचा साथीदार आकाश अशोक गायकवाड रा. मेस्कोमाता नगर याला अटक करण्यासाठी बुलढाणा गेलेल्या पथकाला गुंगारा देत तो, मुद्देामलासह पंजाब राज्यात पसार झाला होता. रविवारी रात्री संशयित आरोपी आकाशला दारूच्या नशेत असतांना अटक केली आहे.
ही कारवाई सहाय्यक फौजदार अतूल वंजारी, आनंदसिंग पाटिल, किशोर पाटिल, मुकेश पाटिल, चेतन सोनवणे, आसीम तडवी, योगेश बारी सचिन पाटिल यांनी केली. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.