जळगाव, प्रतिनिधी । महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील महापालिकेच्या स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयात जाऊन कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस (84 दिवसांनंतर) घेतला.
याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी उपस्थितांसमोर लस ही आपल्या सुरक्षिततेसाठीच आहे, काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही. नागरिकांनी शहरातील विविध केंद्रांवर जाऊन वयोगट, प्राधान्यक्रमानुसार पहिला किंवा दुसरा डोस लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार घेऊन कोरोनामुक्तीच्या लढ्यात उत्स्फूर्तपणे सहभागाचे आवाहन केले.