Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धरणगाव येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व अन्नदान

by Divya Jalgaon Team
June 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
धरणगाव येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व अन्नदान

धरणगाव, प्रतिनिधी । आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला, याप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना भोजन देण्यात आले.

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले बाळकडू 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतुने धरणगांव शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. या आनंदाच्या प्रसंगी धरणगाव शहर शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने व शासनाचे सर्व नियम व अटी पाळून करण्यात आले.

सर्वप्रथम शहरातील सोनवद रोड येथील अमरधाममध्ये डेरेदार वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते वटवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे सोनवद रोड कडील स्मशानभूमीत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील अमरधाम येथे सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाचा कार्यक्रमानंतर अन्नदानाचा कार्यक्रम हा करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठाण, किरण मराठे, तसेच शिवसैनिक रवींद्र जाधव, मच्छिंद्र पाटील, तोसिफ पटेल, वाल्मीक पाटील ,दिलीप पाटील, मोहन महाजन, कमलेश बोरसे, विशाल महाजन, राहुल रोकडे, यशवंत चौधरी, सचिन सोनवणे, गुड्डू पटेल, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, ज्ञानेश्वर माळी, गजानन महाजन, चेतन जाधव, सतीश बोरसे, विलास पवार, करण वाघरे, पापा वाघरे, परमेश्वर माळी, संजय धामोडे, छोटू चौधरी, भीमा धनगर, गोपाल पाटील, गोपाल चौधरी, योगराज खलाने, अरविंद चौधरी व महेंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

अन्न दाना चा कार्यक्रमासाठी दिपक महाजन व दिपेश सोनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिवसैनिकांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहर प्रमुख राजेद्र महाजन यांनी आभार मानले.

Share post
Previous Post

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय डाक ८०० ठिकाणी एकाच वेळी करणार विशेष रद्दबातल शिक्क्याचे अनावरण

Next Post

महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी घेतली कोरोनाची लस

Next Post
महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी घेतली कोरोनाची लस

महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी घेतली कोरोनाची लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group