यावल – पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांची जळगाव येथील मुख्यालयात तात्काळ बदली करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांची अचानक झालेली बदली हे संपुर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनाला आहे.
पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी जानेवारी २०२०मध्ये यावल पोलीस स्टेशनचे पदभार स्विकारले होते, आपल्या दहा महीन्याच्या कालावधीत पोलीस निरिक्षक पदाची सुत्र स्विकारल्यानंतर त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मार्गी लावले.
संपुर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाचे लॉकडाऊन नियमावलीची काटेकोर अंमलबाजवणी करण्यासाठी पोलीस निरिक्षक धनवडे यांनी कडक उपाययोजना केली. काल रात्री उशीर त्यांची जळगाव पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात बदली झाल्याची माहीती स्वतः पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी दिली.