जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ५३ रुग्ण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून आजच दिवभरात एका रूग्णाचा मृत्यू झाले आहे,तसेच आज १२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-७ , जळगाव ग्रामीण-५ , भुसावळ-०, अमळनेर-२ , चोपडा-३ , पाचोरा-२ , भडगाव-1 , धरणगाव-६ , यावल-१, एरंडोल-२, जामनेर-३, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ असे एकुण ५३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हाभरात आजच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ८३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ७६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार५०६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान आज दिवसभरात जळगाव ग्रामीणमधील एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.