Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ जून २०२१

by Divya Jalgaon Team
June 18, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

वृषभ:- गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कमिशनमधून चांगली कमाई होईल. बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

मिथुन:- बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा. हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

कर्क:- सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा.

सिंह:- तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.

कन्या:- आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा. लेखन क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान लाभेल.

तूळ:- अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

वृश्चिक:- कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.

धनू:- तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

मकर:- इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

कुंभ:- तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.

मीन:- गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील.

Share post
Tags: १८ जून २०२१आजचे राशीभविष्यशुक्रवार
Previous Post

टायगर ग्रुप जळगावतर्फे आज अन्नदान व वृक्षारोपनाचा कार्यक्रम

Next Post

सोने – चांदीच्या दरात घट; जाणून घ्या लेटेस्ट दर

Next Post
सोने - चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

सोने - चांदीच्या दरात घट; जाणून घ्या लेटेस्ट दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group