नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख मिरवणाऱ्या स्टेट बँकेचे सर्व ऑनलाइन व्यवहार गुरुवार १७ जून २०२१ रोजी बंद राहणार आहेत. स्टेट बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा, स्टेट बँकेची यूपीआय सेवा आणि स्टेट बँकेची योनो अॅप सेवा गुरुवार १७ जून २०२१ रोजी बंद राहणार आहे.
सर्व्हरच्या देखभालीच्या कामांमुळे स्टेट बँकेचे सर्व ऑनलाइन व्यवहार गुरुवार १७ जून २०२१ रात्री १२.३० ते २.३० या वेळेत बंद राहतील. मध्यरात्री फक्त दोन तासांसाठी ऑनलाइन व्यवहार बंद राहतील. स्टेट बँकेचे बहुसंख्य सामान्य भारतीय ग्राहक या कालावधीत ऑनलाइन व्यवहार करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. यामुळे ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार बंद असले तरी त्रास होणार नाही.
पण मर्यादीत ग्राहक मध्यरात्री ऑनलाइन व्यवहार करण्याची शक्यता आहे. या ग्राहकांना सर्व्हर देखभालीच्या कामामुळे ऑनलाइन व्यवहार करणे शक्य होणार नाही. ही बाब विचारात घेऊन स्टेट बँकेने आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच मेसेज पाठवून ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार दोन तास बंद राहणार असल्याची कल्पना दिली आहे.
स्टेट बँकेचे ८ कोटी ५० लाख ग्राहक इंटरनेट बँकिंग गरजेनुसार वापरतात. तसेच स्टेट बँकेचे १ कोटी ९० लाख ग्राहक मोबाइल बँकिंग गरजेनुसार वापरतात. स्टेट बँकेचे योनो अॅप सहजतेने डिजिटल व्यवहार करण्यासाठी ३ कोटी ४५ लाख जणांनी डाऊनलोड केले आहे. दररोज ९० लाख ग्राहक योनो अॅपवर लॉग इन करतात. डिसेंबर २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत १५ लाख नवी योनो खाती सुरू झाली.
कर्ज पुरवठा करणाऱ्या भारतातील बँकांमध्ये स्टेट बँक पहिल्या क्रमांकाची बँक आहे. भारतासह जगभरात स्टेट बँकेच्या २२ हजार १४१ शाखा आणि ५८ हजार ५५५ एटीएम आहेत. यापैकी सर्वाधिक शाखा आणि सर्वाधिक एटीएम भारतात आहेत. स्टेट बँक ही भारतीय उपखंडातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बँक आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी डिजिटल बँकिंगला प्राधान्य देण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला. यामुळेच बँकेच्या डिजिटल सेवा घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience.#InternetBanking #YONOSBI #YONO #ImportantNotice pic.twitter.com/Nk3crZQ2PG
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 16, 2021