जळगाव – ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून जनसंख्यानुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्या. अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जळगाव जिल्ह्यातील तेली समाजाच्यावतीने देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष के. डी चौधरी जळगाव ,जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर, जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मला रामचंद्र चौधरी ,जिल्हा महासचिव दत्तात्रय तुकाराम चौधरी, ज्येष्ठ सल्लागार ऍड वसंतराव शिवदास भोलाने, संजय नारायण चौधरी, देवकांत के चौधरी ,दशरथ चौधरी ,संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना १४ जून २०२१ रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या संदर्भात उचित पाऊले उचलून आरक्षणाचा कायदा करण्यासंदर्भात आग्रही मागणी केली. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एक महिन्याच्या आत आवश्यक कार्यवाही करण्याचे यावेळी सांगितले.
तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना कळविण्याची विनंती ही जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष प्रशांत सुरडकर यांनी एक महिन्याच्याआत कोणतीही कार्यवाही दिसून न आल्यास तेली समाज जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून असा इशारा दिला व ओबीसींना न्याय द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा आघाडीच्या महिला अध्यक्ष निर्मला चौधरी यांनीही आंदोलनात महिला आघाडीवर असतील असे नमूद करून ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली .एडवोकेट वसंतराव भोलाने यांनी मंडल आयोगापासून ओबीसींची माहिती देत ओबीसींच्या आरक्षणाला जो आळा बसला याची सविस्तर माहिती देत ओबीसींना न्याय देण्याची गरज असल्याचे सांगितले.