Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अंगाला नाणी, भांडी, लाकूड चिटकलेही अन विज्ञानही सिद्ध झाले

महाराष्ट्र अंनिस, मविपच्या सहकार्याने जिल्हाधिकाऱ्यांची जनजागृती

by Divya Jalgaon Team
June 14, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
अंगाला नाणी, भांडी, लाकूड चिटकलेही अन विज्ञानही सिद्ध झाले

जळगाव –  अंगाला भांडी, नाणी, लोखंड, लाकूड, प्लास्टिक चिटकायला लागली… चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष प्रकार सुरू… त्यामुळे उत्सुकताही वाढली… मात्र त्यामागील विज्ञान उघडताच त्यातील फोलपणा झाला उघड… होय, सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकाराने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद यांनी अंगाला वस्तू चिकटणेमागचे विज्ञान सांगून जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला.

कोव्हीड १९ प्रतिबंधक कोव्हीशिल्डच्या दोन्ही लस घेतल्यानंतर काही दिवसांनी शरीरात मॅग्नेट सिस्टीम तयार होते व वस्तू चिकटतात,असा दावा नाशिक येथील वयोवृद्ध गृहस्थाने केल्यानंतर महाराष्ट्रात, भारतात व विदेशातही कहर माजला. हा दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून फोल ठरवला. त्यामागची चिकित्सा केली आणि शरीरात लस घेतल्यानंतर चुंबकत्व तयार होत नाही हेच सिद्ध केले.

सोमवारी १४ रोजी जळगाव शाखेच्या मअंनिस व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात मॅग्नेट मॅनचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचीव दिलीप भारंबे यांनी सप्रयोगाने सिद्ध केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण उपस्थित होते. प्रस्तावना जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी केली.

यावेळी अंनिसचे कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी अॅड.भरत गुजर, राजेंद्र चौधरी, शिरीष चौधरी, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी व वैशाली चौधरी यांनी सहभाग नोंदविला.

चुंबकत्व सिद्धांत दावा फोल कसा ठरवता येतो?
१)
प्रथम जी लस घेतली जाते ती ०.5ml असते.त्यात लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात.म्हणजे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

२) दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेट मॅनने स्टेनलेस स्टीलचे चमचे,नाणी,ताट,वाटी यासारखे पदार्थ चिकटवले होते.पण लाकूड, प्लास्टिक यासारखे पदार्थ देखील चिकटतात.या पदार्थांमध्ये लोखंड नसते तरीही ते चिकटतात.चुंबक फक्त लोखंडाला आकर्षित करतो हे आपण विज्ञानात शिकलो.

मग आता प्रश्न आहे की हे पदार्थ शरीराला कां चिकटतात?
नंबर एक जर शरीरात चुंबकत्व असेल तर ते आपल्याला सहज सिद्ध करता येते.प्रयोगशाळेत चुंबकसूची असते,ती नेहमीच उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असते.तीला चुंबकाजवळ नेल्यास ती हलते.मग आपण ही चुंबकसूची त्या दावा करणाऱ्या मॅग्नेट मॅनजवळ नेल्यास हा दावा तपासता येईल.

पण वस्तू कां चिकटतात?
पहिली गोष्ट त्या व्यक्तीचे अंग गुळगुळीत असावं,रबरासारखे मऊ असावं, केस नसावे,अशा व्यक्ती हा प्रयोग सहज करू शकतात.आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो,त्यात सिबम नावाचे तेलकट,घामट द्राव श्रवतो.या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण (adhesive force) या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो, एक बंध तयार होते.घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात. याला आपण चुंबकत्व म्हणाल तर विज्ञानाची हारच आहे.

मॅग्नेट मॅनचे प्रयोग जगात यापूर्वी अनेक देशांमध्ये झाल्याच्या नोंदी आहेत.पण चिकित्सा करुन ते फोल ठरवले गेलेत.

जेम्स रॅंडी या जागतिक प्रख्यात चिकित्सकाने एका व्यक्तीने टेबलचा टाॅप छातीला चिकटण्याचा दावा केला होता,तो दावा रॅंडीने हाणून पाडला.रॅंडीने त्या व्यक्तीच्या शरीरावर टाल्कम पावडर चोपडली असता तो टेबलचा टाॅप चिकटवू शकला नाही.कारण पावडरमुळे शरीरावरील सिबम द्राव शोषली जाऊन त्वचेचे घाम श्रवणारी छिद्रे बंद होऊन तेलकट द्राव स्रवत नाही हे सिद्ध होते.

Share post
Tags: collecter officeDivya Jalgaonmaharastra andh shardha nirmulan samitiअंगाला नाणी
Previous Post

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group