चोपडा – ७ मे २०२१ चा जी.आर.रद्द करण्यात यावा यामागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून रिपाई चे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ता. अध्यक्ष भिवराज रायसिंगे यांच्या नेतृत्वखाली निवेदन सादर करण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ता. अध्यक्ष भिवराज रायसिंगे यांच्या नेतृत्वखाली निवेदन सादर करण्यात आले की पदोन्नती मध्ये आरक्षण हा मागासवर्गीय यांच्या हक्क आहे त्यामुळे ७ मे २०२१ ला काढलेला जी.आर.संविधान विरोधी आसुन मागासवर्गीय समाजावर अन्याय होईल असा असून तो जी.आर.रद्द करण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत पुर्वीच्या जी.आर.नुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी भिवराज रायसिंगे व शहर अध्यक्ष विनोद बडगुजर ता.युवा.अध्यक्ष राधेशाम गवळी व सोशल मिडीया आय.टी.सेल चे जि.संपर्क प्रमुख महेंद्र करण काळे व सोशल मिडीया आय.टी.सेलचे शहर अध्यक्ष महेश पाटील यांची उपस्तिथी होती.