Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘माझी वसुंधरा’ स्पर्धेंतर्गत मारलेली बाजी अभिमानास्पदच

पालकमंत्री गुलाबरावजी पाटील : जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार

by Divya Jalgaon Team
June 8, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
‘माझी वसुंधरा’ स्पर्धेंतर्गत मारलेली बाजी अभिमानास्पदच

जळगाव – राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21 मध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावत पुरस्कारांत बाजी मारली, हे कौतुकास्पद आहेच. याशिवाय या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेला सन्मान जळगाव जिल्ह्यासाठी व पालकमंत्री म्हणून माझ्यासाठीही अभिमानास्पदच बाब आहे.

या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांनी एकदिलाने झोकून देत आपले कार्य केल्यानेच हा जिल्ह्याला बहुमान मिळाला. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री.राऊत व जिल्हा परिषद सीईओ डॉ.पाटील यांचा आजचा हा जिल्ह्याच्या वतीने होत असलेला छोटेखानी सत्कार सोहळा खर्‍या अर्थाने कुटुंबाकडूनच होत असलेला सन्मान आहे. त्यामुळे ही ऊर्जा आपणा दोन्ही अधिकार्‍यांना पुढील कार्यकाळासाठी नक्कीच फलदायी ठरेल, अशी शुभेच्छा पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांनी आज त्यांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री.एन.एस. चव्हाण, जिल्हा शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. श्री.जयप्रकाश रामानंद, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, महापालिका पर्यावरण विभागाचे श्री.दिघे, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री. विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, नगरसेवक श्री.नितीन बरडे, प्रशांत नाईक, विराज कावडिया, अमित जगताप यांच्यासह निवासी जिल्हाधिकारी श्री.राहुल पाटील, तहसीलदार श्री.नामदेवराव पाटील व प्रशासनातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील म्हणाले, की ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21 मध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावत पुरस्कारांत बाजी मारली, हे कौतुकास्पद आहेच. याशिवाय या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेला सन्मान म्हणजे जिल्ह्यातील प्रशासन व पदाधिकार्‍यांमधील उत्कृष्ट समन्वयाचे हे फळ आहे.

गेल्या अडीच-तीन वर्षांत माझे जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकार्‍यासमवेत अरेरावी झालेली नाही. त्याचे कारण सर्वच मंडळी चांगले काम करीत आहे. त्याचाच भाग म्हणून ‘कोविड-19’च्या थैमानात देशातील पहिल्या दहामध्ये असलेले जळगाव आता सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा बनला आहे, ही बाब निश्चितपणे आनंददायी आहे. मी पालकमंत्री नात्याने या कार्यक्रमात सर्वांचे अभिनंदन करतो. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडून ‘कोविड-19’च्या सद्यःस्थितीविषयी माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत म्हणाले, की जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून सर्वाधिक चांगले काम करणे, माझे कर्तव्यच आहे. मात्र, शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवून त्याचे वेगळेपण ठरणारे मॉडेल निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनातील माझ्या सर्वच सहकारी अधिकार्‍यांनी झोकून देत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21 साठीचा पुरस्कार खेचून आणला, ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे आम्हा सर्व टीमला मिळालेली खरोखर ऊर्जा मी समजतो. आगामी काळातही आम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले काम करू. ‘कोविड-19’च्या अनुषंगाने आपल्याला पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात आलेले यश ही सुद्धा आपली सर्वांची महत्त्वपूर्ण जमेची बाजू म्हणावी लागेल.

सुरवातीला पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, जळगावच्या प्रथम नागरीक अर्थात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे यांनी जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

Share post
Tags: ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21Divya JalgaonDivya Jalgaon Newspalakmantri gulabrao patiludhaw thakreZP CEO DR.B.N.PATILजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
Previous Post

दुकानदार, नागरिकांनी गर्दी करू नये : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

Next Post

धरणगाव येथे महात्मा गांधी उद्यानातील कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
धरणगाव येथे महात्मा गांधी उद्यानातील कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

धरणगाव येथे महात्मा गांधी उद्यानातील कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group