जळगाव- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रुद्राक्षा फौंडेशनच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन पर्यावरण वाचण्याचा वसा हाती घेतला. कोरोनाच्या या महामारीच्या काळात देशावर खूप मोठे संकट कोसळले आहे. सध्याची परिस्थिती पहाता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
पर्यावरणाची झालेली हानी ही माणसांच्या हस्तक्षेपामुळे झालेली आहे. त्यामुळे आज आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अजूनही जर आपल्यात काही बदल नाही झाला तर जग विनाशाकडे जाईल. म्हणून युवा पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्याचे जतन करणे ही भविष्याची गरज आहे. ते आपण करायला हवे असं ऑनलाइन मिटिंगच्या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांना रुद्राक्षा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष अश्विनी खलिपे यांनी सांगितले.
त्यानंतर सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली व आपल्या परिसरातील वृक्षसंवर्धन करण्याचा वसा घेतला. अगदी लहानांपासून युवावर्गापर्यंत सर्वांनी झाडांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केलं, तसेच वृक्षारोपणही केले.
या उपक्रमात फौंडेशन अध्यक्ष अश्विनी खलिपे, ईश्वरी यादव, पूर्वा यादव, हर्ष डोंगरे, आयुष शिंदे, सोनाली माने, योगिता जाधव, सागर यशवंत, पूनम देवकर, पल्लवी मोहिते, आयेशा लोहोरा, इंद्रनील खलिपे, हरुबाई यशवंत, विजयालक्ष्मी यशवंत, भारती यशवंत, सोहम यशवंत, राजवीर मोहिते, सानिका मोहिते, सुप्रिया खाडे आदींनी सहभाग नोंदवला.