भुसावळ – भुसावळ शहरातील गजानन महाराज नगर भागातील महिला कोटेजा विद्यालयातील वाचमेन यांच्या आईच्या मानेवर सुनेने लोखंडी विळ्याने वार केल्याची घटना दि 2 रोजी सायंकाळी सहा 6:40 वाजेच्या दरम्यान घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, श्रीमती पद्माबाई विद्यालय प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय गजानन महाराज नगर भागातील महिला कोटीच्या विद्यालयात 8 वर्षापासून वाचमेन नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे व त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे परिवार होता.
दिनांक 2/६/२०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावरती माल खरेदी करण्यासाठी गेला असता त्यादरम्यान रविंद्र सोनवणे यांची पत्नी उज्वला रविंद्र सोनवणे यांची व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला तो विकोपास जाऊन उज्वला सोनवणे यांनी धारदार शस्त्र विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारल्याची घटना सायंकाळी 06:40 वाजेच्या दरम्यान घडली.
सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे परी.डी वाय एस पी.नितीन गणापुरे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे