मुंबई प्रतिनिधी – भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी संबंधित सर्व पोलिस अधिकार्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विकृत बाळासाहेब पाटील यांनी राज्यपाल यांना दिले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जालन्याचे पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे व याची मिडियाच्या माध्यमातूनही दखल घेण्यात आली आहे. गवळी समाजा विषयी DYSP यांनी अपशब्द वापरल्याने शिवराज नारियलवाले यांच्या माध्यमातुन याचे व्हिडियो चित्रण करण्यात आले. या विषयाचा राग मनात ठेवुन स्वत: DYSP व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी शिवराज याला निर्दयी पणे मारहाण करण्यास सुरुवात केली हे खुपच घृणास्पद आहे. जर शिवराज नारियलवाले यांचा दोष होता तर त्यांच्या वर गुन्हा दाखल करून न्यायालया समोर उभे करायला पाहिजे होते परंतु तसे न करता DYSP व त्यांच्या पोलीस अधिका-यांनी आतंकवादया पेक्षाही वाईट वागणूक त्या तरुणाला दिली आहे. या प्रकरणातील DYSP श्री. खेरडकर यांना काही दिवसांपूर्वी लाच घेण्याच्या विषयात निलंबित करण्यात आले आहे, अशी संस्कृती असणारे अधिकारी जाणीवपूर्वक तरुणांना असा त्रास देणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापी सहन करणार नाही. या प्रकरणात आता पर्यंत ५ पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक श्री. महाजन हे निलंबित झाले आहे.
मागण्या
सर्व मारहाण करणा-या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच शिवराज नारियलवाले यांच्यावर पोलिसांकडून दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेची पुर्णतः हामी घ्यावी.
https://www.youtube.com/watch?v=M-VxANyJeLY