जळगाव – महापालिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडूू देणार नाही. लवकरच जळगावला भेट देणार असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित कामांची यादी घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा मुंबईला बाेलावले असल्याची माहिती महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी साेमवारी मुंबईला जाऊन प्रथमच नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी नगरविकास मंत्री शिंदे यांनी त्यांना जळगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. या वेळी शिवसेनेचे रावेर तालुका संपर्कप्रमुख विलास पारकर, गजानन मालपुरे, नगरसेवक ललित कोल्हे आदी उपस्थित होते.