जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीमधून वीज वितरणाच्या डीपीमधून ऑईलची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील थोड्याच अंतरावर एमआयडीसी परिसरातुन दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजता विज प्रवाह खंडीत झाला होता. वीज प्रवाह सुरू ठेवण्यासाठी विद्यूत महावितरण कंपनीचे कर्मचारी खंडीत झालेल्या भाग शोध काम सुरू
या डिपीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १२ हजार रूपये किंमतीचे ४०० लीटर ऑईल चोरून नेल्याचे उघडकीला आले. महावितरण कर्मचारी जितेंद्र दत्तूसींग भोळे यांच्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोकॉ. विजय पाटील करीत आहे.