जळगाव – शहरातील रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये एका 30 वर्षीय तरुणावर सिमेंटलेस- टोटल हिप रिप्लेसमेंट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
या रुग्णाच्या हिप जॉइंटमधील हाडांना रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे ते निकामी झाले होते. त्या ठिकाणी कृत्रिम सांधारोपण करणे गरजेचे होते. ही गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.राजेंद्र सरोदे, त्यांचे सहकारी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.शौनक पाटील, भूलतज्ज्ञ डॉ.पूनम लढ्ढा यांनी यशस्वीरित्या केली. रुग्णाची आर्थिक स्थिती लक्षात घेता त्याच्यावर अत्यल्प शुल्कात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्ण आता नॉर्मल स्थितीत आहे, असे डॉ.राजेंद्र सरोदे यांनी सांगितले.