जळगाव – जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन समोर मोदी सरकारच्या सात वर्षाच्या जनतेला मिळालेल्या वनवासाचा एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, दीपक सोनवणे, गोकुळ चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला. अशी माहिती जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मराठे म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही.
मोदींच्या या जुलमी, अहंकारी, हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी रोजी काँग्रेस ने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात आंदोलन केले आहे.