जळगाव –येथील शासकीय वेद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी हे शुक्रवारी दि.28 मे रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजता जेवण आटोपून कार्यालाकडे परतत असताना त्याचा अपघात झाला. त्यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णलयात उपचार सुरू आहे.
शुक्रवारी दुपारी ३.45 वाजता विश्वजीत चौधरी हे स्वतःची दुचाकी क्र. (एम.एच.19, ए एल 4458) ने कार्यालयाकडे जात असताना एम जे कॉलेज मागील लक्ष्मी नगर परिसरात त्याची दुचाकी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी पडल्याने त्यांना जबर मार लागला. यात त्याचा डावा हात फॅक्चर झाला आहे.
यावेळी त्यांना परिसरातील नागरिकांनी व मनोज वारके यांनी मदत कार्य करून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याठिकाणी सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला इन्चार्ज सिस्टर जोगी यांनी त्यांच्यावर उपचार केले आहे त्याचबरोबर हाताला फॅक्चर झाले असून अस्थिव्यंग उपचार तज्ञ डॉ. योगेश गांगुर्डे, शल्यचिकित्सक डॉ.उमेश जाधव यांनी तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे.
संध्याकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.