यावल : हिंगोणा,न्हावी,आमोदा,पिंपरुड (ता.यावल) येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियान अंतर्गत नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यातील कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्ण अत्यावस्थेत पोहचण्याच्या आधीच त्यांचे निदान व्हावे म्हणुन प्रशासनातर्फे अनेक उपायोजना करण्यात येत आहेत, त्याचाच भाग म्हणुन यावल तालुक्यातील हिंगोणा,न्हावी, आमोदा,पिंपरुड,हंबर्डी गावात वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर व सर्व आरोग्य,महसुल कर्मचारी तसेच लोकप्रतिनीधी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियान अंतर्गत सर्वेक्षणास प्रत्यक्ष उपस्थित राहुन ताप, सर्दी, खोकला यासरख्या करोना सदृश्य लक्षण आढळलेल्या व कोरोणा रुग्णांच्या अती/कमी जोखमीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे घशातील/नाकातील स्वैब घेऊन कोरोणा आजाराची तपासणी करुन प्राथमिक अवस्थेत कोरोणाचे रुग्ण शोध व्हावा म्हणुन प्रयत्न करत आहेत.
प्राथमिक लक्षणांमध्येच कोरोना चाचणी करुन घेतल्याने आपली प्रकृति अत्यावस्थेत जाण्याआधीच आपणास त्याचे निदान होते व त्यामुळे लवकर या आजारावर मात करण शक्य होत. त्याचप्रमाणे आपण कोरोना संक्रमित असण्याची शक्यता असतांना देखील लक्षण लपविल्यास, कोरोना आजाराचे संक्रमण आपण आपल्या घरातील लोकांना व जवळच्या मित्रमंडळींना देत असतो त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता स्वत:सोबतच आपल्या कुटंबीयांचे देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ. अभिषेक ठाकुर यांनी केले.
प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लहान बालक व गरोदर मातांच्या तपासणीसह लसीकरणावर विशेष लक्ष देऊन गेल्या 6-7 महिन्यांपासुन लाभार्थ्यांना कुठल्याही आरोग्य सुविधेपासुन वंचित राहु दिलेले नाही त्यामुळे विविध गावातील लोकप्रतिनीधी व नागरींकांकडुन त्यांचे कौतुक केले जात आहे.
कोरोणा आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.परीषदेचे.सी.ई.ओ.डॉ.बीएन पाटिल, सिव्हील सर्जन डॉ.एन.चव्हाण, जि.आ.अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, ता.आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, प्रभारी ता.आ.अधिकारी व प्रा.आ.केंद्र हिंगोण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत कोरोणा साथउद्रेकावर मात करण्याकरीता व गरोदर मातांच्या तपासणीसह बालकांच्या लसीकरण राबविण्याकरीता एल.एच.व्ही. श्रीमती एन.एम.चौधरी, एच.ए. अशोक तायडे, श्री.डोळे,आरोग्य सेविका वैशाली तळेले,आ.सेवक विलास महाजन, आरोग्य सेविका के.टि.पाटील,श्रीमती.कामिनी किनगे, आ.से. श्री सावळे, श्रीमती गावडे, कैलास कोळी, प्रकाश कोळी ,आशा वर्करांसह सर्व कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक कष्ट घेत आहेत.


