जळगाव- जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील मोठ्या आनंदाने दुर्गात्सोव साजरा करण्यात येणार आहे.
हा उत्सव धार्मिक स्वरूपाचा असल्याने या कालावधीत कत्तलखाने तसेच बीफ मार्केट चालू ठेवल्यास हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे दिनांक १७- १०-२०२० रोजी घटस्थापनेच्या दिवशी व २६-१०-२०२० रोजी विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील कत्तलखाने, बीफ मार्केट आणि मटण मार्केट बंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दिले आहेत.