शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – आपल्या कार्यकर्तुत्वातुन संपुर्ण देशात मोफत कोव्हीड सेंटरमुळे नावलौकीक मिळविलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंकेश यांच्या कोव्हीड सेंटरला औषधे, फळे, सॅनीटायझर, धान्य, इतर मिळून लाखोंचे साहित्य जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरुड व विघ्नहर्ता हॉस्पीटलचे संचालक डॉ. सागर गरूड यांनी सुपूर्द केले आहे. ३०० कि मी वरून ट्रकमध्ये साहित्यभरुन आलेल्या मदतीने सेंटरमधील सर्वच भाऊक झालेत.
एका कोरोना योध्द्याची दुसऱ्या योध्दयाला मदत
मागील दोन वर्षांपासुन डॉ सागर गरुड यांचे विघ्नहर्ता हॉस्पीटल जामनेर व पाचोरा येथिल रुग्णांसाठी विघ्नहर्ता ठरत आहे. तसेच, मागील वर्षीपासुन कोरोना संक्रमितांसांठी संजीवनी ठरले आहे. आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे डॉ सागर गरुड यांनी लॉक डाऊनमध्ये गरजुंना आरोग्य सुविधेसोबतच मोफत धान्य, साहित्य, जेवणाचे डबे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात.
तसेच, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील बाळवणी या छोट्याशा गावात तब्बल पंधराशे बेड असलेले कोव्हीड सेंटर मोफत चालवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी केलेले शिवधनुष्य त्यांना सहज जावे या करिता कोव्हिड सेंटरला साहित्य रुपी भेट दिल्याने एका कोरोना योध्याने दुसऱ्या कोरोना योध्याला मदत केल्याचे बोलल्या जात आहे.
आणि सर्वच भारावले …
आ.लंके यांच्या कोव्हीड सेंटरला जगभरातुन मदत येत आहे. डॉ सागर गरुड यांनी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांचे सोबत चर्चा करून सागर दादा मित्र मंडळ व जामनेर तालुका राष्ट्रवादी यांचे सहकार्याने त्यांच्या या कार्यात आपलाही हातभार लागावा म्हणुन मदत रुपी एक क्विंटल चिकू ,एक क्विंटल आंबे, दोन क्विंटल टरबूज, एक क्विंटल केळी ,दोन क्विंटल गहू ,शंभर किलो तेल, 1000 सॅनिटायझर बॉटल, 1000 मास्क ,50 किलो फरसाण तसेच तीन हजार नग अंडी व इतर साहित्य औषधी असे लाखोंचे साहित्य असलेली गाडी कार्यकर्त्यांसह रवाना करण्यात आली. तेथे पोहचताच कार्यकर्त्यांनी सेंटर चालकांना साहित्य सुपुर्द केले. ज्यावेळी सर्व साहित्य वाहना मधुन खाली उतरविण्यात आले त्यावेळी आलेली मदत बघुन चालकांसह सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण भारावून गेले. भैय्या सुर्वे,दत्ता साबळे, सागर कुमावत ,निलेश वाघ, शुभम मोगरे, शेखर बावस्कर, राहुल राजपूत, गणेश पाटील यांनी जाऊन सदर रसद पोहोचविली.
आलेल्या मदतीने मी भारावलो – आ. निलेश लंके
माझ्या तालुक्यातील नागरिकांनी मला त्यांचा कुटुंबप्रमुख म्हणुन निवडून दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत कुटुंब प्रमुख या नात्याने मी माझे कार्य सुरू ठेवले. परंतु, जामनेर तालुक्यामधुन आलेल्या मदतीने माझ्या कार्याला हातभारतर लागला आहे. आणि यामुळे मी भारावलो आहे.