मेष : नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी महत्त्वाची कामे सोपवतील.
वृषभ : नोकरीत कार्य तत्पर राहाल. कामाचा झपाटा वाखाण्याजोगा असेल.
मिथुन : जुनी येणी वसूल झाल्याने चार पैसे हातात राहतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल.
कर्क : नोकरीत अविचाराने वागून त्रास व संकटे ओढवून घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्यावी.
सिंह : बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढत नाहीत याची खात्री करा.
कन्या : महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. कामाची संधी मिळेल.
तूळ : खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. अर्धवट कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. तब्येतीची हयगय करु नये.
धनु : तडजोडीचे धोरण स्विकारून फायदा करून घ्याल. नोकरीत अहंपणा सोडून सहकाऱ्यांना मदत करा.
मकर : तरुणांनी मात्र नाचरेपणा करू नये. खेळाडूंनी खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी कष्ट करावेत.
कुंभ : व्यवसायात पैशाअभावी रेंगाळलेल्या कामांना गती येईल. बॅंका व हितचिंतकांची मदत मिळेल.
मीन : मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात पुढाकार घेऊन कामाची आखणी कराल.