मेष:- कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.
मिथुन:- जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.
कर्क:- अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.
सिंह:- सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
कन्या:- जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.
तूळ:- स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.
वृश्चिक:- वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.
धनू:- भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
मकर:- काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.
कुंभ:- क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.
मीन:- बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.