जळगाव – जिल्ह्यात ३१२ बाधीत रूग्ण आढळून आले असून तब्बल ८९७ पेशंटनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात आठ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मुत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी
जळगाव शहर-१३, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१५३, अमळनेर-१०, चोपडा-९, पाचोरा-८, धरणगाव-१४, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-११, रावेर-२०, पारोळा-०, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-११ इतर जिल्ह्यातील ८ असे एकुण ३१२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
प्रशासनाकडून आज आलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ६२५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार ९२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ७ हजार २०९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.