Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एरंडोल शहरात म्युकरमायकोसिस व पोस्ट कोव्हीड रोगनिदान व मार्गदर्शन शिबीर संपन्न

by Divya Jalgaon Team
May 24, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
एरंडोल शहरात म्युकरमायकोसिस व पोस्ट कोव्हीड रोगनिदान व मार्गदर्शन शिबीर संपन्न

एरंडोल – एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन , सुखकर्ता फाउंडेशन ह्या स्वयंसेवी संस्था व तालुका वैद्यकीय अधिकारी ह्यांच्या पुढाकारातून आणि एरंडोल तालुक्याचे प्रांताधिकारी विनय गोसावी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर जाखीटे भवन एरंडोल येथे पार पडले .

जळगाव येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ् व ह्याविषयी सर्वप्रथम वाचा फोडणारे डॉ . धर्मेंद्र पाटील ह्यांनी म्युकरमायकोसिस च्या आजाराबद्दल , लक्षणाबद्दल सोप्या भाषेत अवगत केले .
नाक चोंदणे , नाकाजवळ व टाळूवर काळसर डाग पडणे , नाकातून काळसर द्रव्य बाहेर येणे ,अचानक डोके दुखणे , दात हलणे , दात दुखणे ,तोंडातून पु येणे , चेहर्र्यावर सूज येणे , तिथल्या भागावर संवेदना नसणे , डोळ्यांची हालचाल नसणे , डोळे बाहेर येणे , डोळ्यासमोर दोन प्रतिमा दिसणे अश्या लक्षणाबद्दल सविस्तर विश्लेषण केले . म्युकरमायकोसिस चे लवकर निदान होणेकामी रुग्णाबरोबरच डॉक्टरांनी हि सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

एरंडोल येथील फिजिशयन डॉ. फरहाज बोहरी ह्यांनी म्युकरमायकोसिस चा आजार संसर्गजन्य नसून तो प्रत्येक कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना होत नसल्यामुळे घाबरण्याची गरज नसून ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे , ज्यांना अनियंत्रतीत मधुमेह आहे , ज्यांनी स्टेरॉईड सह इतर जीवरक्षक ओषधी घेतली आहे अश्यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले .

जळगाव येथील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राहुल मयूर ह्यांनी म्युकरमायकोसिस साठी लागणाऱ्या निदानचाचण्याबाबत मांडणी करतांनाच पोस्ट कोव्हीड रुग्णांमध्ये अर्थात कोरोनासंसर्गानंतर सकारात्मक मानसिकतेची गरज असल्याची व त्यासाठी कुटुंब व मित्र ह्यांच्यासोबतीची , योग , प्राणायम व व आवडत्या गोष्टी , छंद जोपासण्याची आवश्यकता व्यक्त केली . एरंडोल येथील फिजिशियन
डॉ . स्नेहल पाटील ह्यांनी पोस्टकोव्हीड काळात थकवा येणे , दम लागणे , काही रुग्णांना प्राणवायूची गरज पडणे , निद्रानाश अश्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असलं तरी ह्या समस्या काही काळानंतर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यानंतर दूर होणार असल्यामुळे घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे मत व्यक्त केले.

एरंडोल येथील नाक कान घसातज्ञ डॉ . प्रियांका वाघ ह्यांनी म्युकरामायकोसिस हा गंभीर आजार असल्यामुळे कोरोनासंसर्गातून मुक्त झाल्यानंतर रुग्णांनी नाकातील समस्येबाबत सतर्क राहणे महत्वाचे असून सहा महिन्यापर्यंत दर महिन्याला विशेषतज्ञ् ह्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
फिजिशियन डॉ . सुयश पाटील ह्यांनी रुग्णांनी वैयक्तीक काळजी घेणे , स्वच्छ मास्क वापरणे , धुळीपासून दूर राहणे , व पोस्टकोव्हीड काळात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

एरंडोल शहरातील दंतरोगतज्ञ् व ह्याविषयी जनजागृती करणारे डॉ . मकरंद पिंगळे ह्यांनीकोरोनासंसर्ग मुक्तीनंतर तोंडाच्या व दातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले .
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . फिरोज शेख ह्यांनी म्युकरमायोसीस ला रोखण्यासाठी आरोग्ययंत्रणा योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर कार्यान्वित करत असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार ह्या आजारावर केले जात असून आता म्युकरमायकोसिस हा आजार साथ रोग म्हणून घोषित करण्यात आल्याचे नमूद केले.

एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तुषार देवरे ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चोधरी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश चोधरी,माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड , माजी उपनगराध्यक्ष संजय चोधरी , माजी नगरसेवक जगदीश ठाकूर , नितीन ठक्कर , केशव ठाकूर ,सुनिल चोधरी , प्रमोद पाटील , निलेश मानुधने ,ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ . एस . टी . पाटील,राखी काबरा , सौ . उज्वला राठी , डॉ शेखर पाटील , डॉ . राहुल पाटील ( बालरोगतज्ञ् ) ह्यांचा समावेश होता.

एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ . सुधीर काबरा ह्यांनी ह्या शिबिराचा उद्देश हा नागरिकांना घाबरविण्याचा नसून एकत्रितपणे जागरूक राहून ह्याविरोधी काम करण्यासाठी आहे असे मत व्यक्त केले . सचिव डॉ . राहुल वाघ ह्यांनी सर्व वैद्यकीय विशेषतज्ञ् ह्यांचे व जाखेटे भवन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल राजस्थानी महिला मंडळ ह्यांचे आभार मानले .

सूत्र संचालन सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी केले . हे मार्गदर्शन व रोगनिदान शिबीर यशस्वी होणेकामी सुखकर्ता फाउंडेशनचे श्री . शेखर बुंदेले , युवा कार्यकर्ते प्रसन्न परदेशी व सहकारी मित्रानी परिश्रम घेतले

Share post
Tags: corona related newsDivya Jalgaonडॉ . धर्मेंद्र पाटीलम्युकरमायकोसिससुखकर्ता फाउंडेशन
Previous Post

मविप्र वाद : निलेश भोईटे गटाकडून घरावर दगड फेक जयवंत भोईटे चा आरोप

Next Post

पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार

Next Post
पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार

पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group