जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात आज नव्याने ४०६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर आज ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज ८७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण- ०८, भुसावळ- ३१, अमळनेर-२३, चोपडा- ३६, पाचोरा- २८, भडगाव-०२, धरणगाव-१४, यावल-२२, एरंडोल- २५, जामनेर- ४८, रावेर- ३१, पारोळा -१७ , चाळीसगाव- ५५ , मुक्ताईनगर- १६ , बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील १० असे एकुण ४ ०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ३७ हजार ९५१ बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी १ लाख २७ हजार १६७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८ हजार ३०६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.