Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका – इंडस्ट्रियल असोसिएशनची पालकमंत्र्यांना मागणी

by Divya Jalgaon Team
May 22, 2021
in जळगाव
0
जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका – इंडस्ट्रियल असोसिएशनची पालकमंत्र्यांना मागणी

जळगाव, प्रतिनिधी । चिंचोली शिवारातील उमाळा – नशिराबाद रोडजवळील ग्रामीण उद्योजकांना सध्या वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. याबाबत शनिवारी २२ मे रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे. तसेच चिंचोली फिडरचे काम रखडले असून ते लवकर पूर्ण व्हावे असे साकडे घातले आहे.

निवेदनात म्हट्ले आहे की, चिंचोली शिवारात विद्युत फिडरच्या कामाला मंजुरी मिळाली असली तरी अद्याप त्याचे काम सुरु झाले नसून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन आणि भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून देखील या समस्येवर तोडगा निघालेला नाही. यामुळे कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तरी पालकमंत्री यांनी ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, राजीव बियाणी, अनिल माळी, किशोर ढाके, मनोज मित्तल, हरीश जोशी, अरुण बोरोले आदी उपस्थित होते .

चिंचोली फिडर बसून मिळावे यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री
वीज पुरवठा सारखा जातो याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो व आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. ग्रामीण उद्योजकांच्या विकासासाठी चिंचोली फिडर बसून मिळावे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. यासाठी राज्य शासनाची तांत्रिक परवानगी लागते. त्याबाबतचा पाठपुरावा मी करीत आहे, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण उद्योजकांना दिले आहेत. उद्योजकांच्या समस्या व अडचणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतल्या तसेच लॉकडाऊनमुळे सध्या परिस्थिती काय आहे याचे आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

Share post
Tags: Gulabrao PatilJalgaonlatest newsMarathi Newsजळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका - इंडस्ट्रियल असोसिएशनची पालकमंत्र्यांना मागणी
Previous Post

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post

मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

Next Post
मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group