जळगाव, प्रतिनिधी । येथील युवा प्रेरणा फाउंडेशनकडून पद्मावती मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांना पीपीई किट वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनच्या नवीन नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला भेटण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना पीपीई किट घालणे बंधनकारक आहे, युवा प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.विक्कीभाऊ सोनार यांच्या माध्यमातून भरारी फाउंडेशनच्या सहकार्य ने पद्मावती मंगल कार्यलय येथे सुरू असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या निवारा मदत केंद्रात रुग्णाच्या नातेवाइकांना ३० पीपीई किट वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भाजपा जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे – पाटील, दिपक परदेशी, सुशील हासवाणी, अमित भाटिया, संजय लुल्ला, अनिल जोशी, युवा प्रेरणा फाउंडेशन अध्यक्ष विक्की सोनार, जुगल लुल्ला, राकेश जोशी, दीपक जोशी आदींची उपस्थिती होती.