जळगाव, प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईच्या कामाला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या होत्या. महापौरांच्या सुचनेनंतर मनपा प्रशासन कामाला लागले असून जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मेहरूण परिसर आणि श्रद्धा कॉलनीतील नाले सफाईच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, प्रभाग समिती अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील सर्व मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई योग्य पध्दतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच नाल्याकाठी असलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.